Wed. Oct 5th, 2022

आमदार भरत गोगावले यांच्या गाडीचा अपघात

एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद असलेले आमदार भरतशेठ गोगावले यांच्या गाडीचा मुंबईत अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील फ्री वेवर हा अपघात झाला आहे. यावेळी फ्री वेवरून जात असलेल्या जवळपास ७ गाड्या एकमेकांवर धडकल्या आहेत. या अपघातात गाड्यांचे नुकसान झाले आहे. भरत गोगावले यांची गाडी मुंबईमध्ये ‘फ्री वे’ वरून जात असताना हा प्रकार घडला आहे .सुदैवाने अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही .मात्र त्यांच्या गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. या अपघातानंतर भरत गोगावले मंत्रालयात दाखल झाले आहेत.

अपघात झाल्यांनतर भरत गोगावले यांच्या गाडीचे ड्रायव्हर यांनी स्वतः माहिती दिली कि या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही . मुंबईमध्ये ‘फ्री वे’ वर सात गाड्या एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाला आहे, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, गाड्यांचं नुकसान झाले असले तरी सगळे जण सुखरूप आहेत अशी माहिती भरत गोगावले यांच्या ड्रायव्हर यांनी दिली आहे . मंत्रालयच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे.

Bharat Gogawale | भरत गोगावले यांच्या गाडीचा अपघात | Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.