‘या’ मार्गावरुन निघणार मनसेचा मोर्चा

मनसेतर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्च्याचा मार्गाचा तिढा अखेर सुटला आहे. मनसेचा मोर्चा ९ फेब्रुवारीला काढण्यात येणार आहे. ( MNS 9 FEBRUARY PROTEST MARCH )

भारतातील बांगलादेश आणि पाकिस्तानमधील घुसखोरांना हाकलण्यासाठी मनसेने हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात काढण्यात येणाऱ्या मोर्च्याला मोर्च्यानेच उत्तर देणार असल्याचं, राज ठाकरे २३ जानेवारीच्या अधिवेशनात म्हणाले होते.

गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांना या वरील मार्गावारुन मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली आहे.

जिजामाता उद्यान ते आझाद मैदान तर  गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असे दोन मार्ग मनसेने मुंबई पोलिसांना  सुचवले होते.

परंतु मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न  निर्माण होऊ नये यासाठी  खबरदारी घेत पहिल्या मार्गाला म्हणजेच जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मार्गावरुन  मोर्चा काढण्यासाठी परवानगी नाकारली.

मनसेचं जनतेला आवाहन

मनसेने जनतेला आवाहन केलं आहे. मनसेच्या या मोर्च्यात मोठ्या प्रमाणास सामील व्हा, असं आवाहन मनसेने सोशल मीडियाद्वारे केलं आहे.

मनसेने या मोर्च्यासंदर्भात एक पोस्टर देखील प्रसिद्ध केलं आहे. हे पोस्टर ‘मनसे अधिकृत’ या ट्विटर खात्यावरुन ट्विट करण्यात आलं आहे.

Exit mobile version