Wed. Oct 5th, 2022

मनसेनं घातलं खड्यात श्राद्ध अन् कार्यकर्त्यांनी केलं मुंडन…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पावसाळा सुरू झाला की मुंबईतील रस्त्यावर खड्डे पडू लागतात. या खड्ड्यामुळे वाहनांची गती तर मंदावतेच पण यामुळे वाहनचालकांना या खड्ड्यातुन वाहन चालविताना कसरत करावी लागते.

मुंबईतील महत्वाचा असलेला चेंबूर नाका ते माहुल गाव या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर पालिकेचा निषेध करण्यासाठी स्थानिक मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी निषेधाच्या घोषणा देत या रस्त्याच श्राद्ध घातलं.

यावेळी मनसेचे अणुशक्ती विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट विजय रावराणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधिवत या श्राद्धाची पूजा करून तसेच स्वतः मुंडन करून या रस्त्याचं श्राद्ध घातलं.

पावसाळा सुरू होऊन फक्त 5 दिवस झाले आणि या रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसू लागले आहे. या विभागाचे खासदार,आमदार तसेच नगरसेवक शिवसेनेचे आहेत.

त्याच बरोबर मुंबई महापालिकेत सत्ताही शिवसेनेची असूनही या चेंबूर ते माहुल गाव या आर.सी मार्गवर खड्डेच खड्डे आहेत. याच मार्गावरून माहुल येथे असलेल्या ऑइल कंपन्यात मोठे टँकर ट्रक याच रस्त्यावरून जातात,यामुळे या विभागात राहणाऱ्या जनतेला याचा त्रास सहन करावा लागतो.

येत्या 15 दिवसात या रस्त्यावरील खड्डे बजावले नाहै तसेच हा दुरुस्त झाला नाहीं तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

महागाईविरोधात मनसेचं अनोख आंदोलन

पाकची साखर कडू, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.