Mon. Jan 24th, 2022

मनसे नेता बाळा नांदगावकर यांनी जनतेला ‘या’बाबतीत केलं आवाहन

मनसे नेता आणि माजी आमदार बाळा नांदगावकर ( MNS Bala Nandgaonkar appeal to public) यांनी जनतेला आवाहन केलं आहे. बाळा नांदगावकर यांनी ट्विटद्वारे जनतेला आवाहन केलं आहे.

अवघ्या काही दिवसांवर होळी आणि रंगपंचमी येऊन ठेपली आहे. या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकरांनी हे ट्विट करत जनतेला आवाहन केलं आहे.

काय म्हणाले बाळा नांदगावकर ?

होळी हा आपल्या सर्वांचा आवडीचा सण आहे. तसेच होळीनंतर येणारे धुलीवंदन आणि रंगपंचमी म्हणजे मनसोक्त रंगाची उधळण असते. पण आपण सध्या कोरोना बद्दल ऐकूनच आहोत.

अनेकदा हे रंग चीन वरून येतात. त्यामुळे शंकेला वाव नको म्हणून यावर्षी आपण हा रंगाचा सण रंगाऐवजी गुलालाची उधळण करून खेळू यात, असं आवाहन बाळा नांदगावकरांनी केलं आहे.

कारण Health is Wealth, असंही आपल्या ट्विटच्या शेवटी बाळा नांदगावकरांनी केलं आहे.

दरम्यान मागील काही आठवड्यांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे.

भारतात 6 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली. राजधानी दिल्ली, तेलंगाणा, राजस्थान, जयपूर या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

अद्यापही या कोरोना विषाणूवर औषध सापडलं नाही आहे.

त्यामुळे कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *