Wed. Oct 5th, 2022

केडीएमसीवर मनसे-भाजपचा मोर्चा

कल्याण डोंबिवली महानगर मुख्यालयावर सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षातर्फे भव्य हंडा कळशी मोर्चा काढण्यात आला आहे. २७ गावातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावात असल्याचा आरोप करत मनसे आणि भाजपने एकत्रित मोर्चा काढला आहे. यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

नागरिक पाण्याच्या प्रश्नामुळे हवालदिल झाले असून प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील आणि  भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केडीएमसीवर ‘तहान मोर्चा’ काढला आहे. यावेळी भव्य हंडा कळशी घेत मोर्चा काढण्यात आला. मात्र, नागरिकांचे हाल होतायेत या कारणास्तव जरी मोर्चा काढला असला तरी, मनसे-भाजप युतीची चिन्हे तर नाहीत ना, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.