Tue. Oct 26th, 2021

मनसे आणि सेना एकत्र येणार का? पोस्टरवरून चर्चेला उधाण

शिवसेना भवनाबाहेर मनसेने पोस्टरबाजी केली आहे. आता या पोस्टरवरून मनसेचे भगवेकरण होणार की काय ? या मुद्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने मनसेने 23 जानेवारीला मुंबईत अधिवेशन आयोजित केले आहे. या पार्श्वभुमीवर शिवाजी पार्क आणि सेनाभवन परिसरात अधिवेशनाचे पोस्टर मनसेकडून लावण्यात आले आहेत.

यातून मनसेची दमदार पोस्टरबाजी दिसून येत आहे. मात्र मनसेचे हे पोस्टर त्याच्या ठराविक चार रंगाच न दिसता संपूर्ण पोस्टर्स हे भगव्या रंगात पाहायला मिळत आहेत.

यावरून आता मनसे आणि सेना एकत्र येणार का? मनसे पक्ष आपला झेंडा बदलणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मनसेचा झेंडा बदलण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील. अधिवेशनाचे पोस्टर हे भगव्या रंगात लावले आहेत कारण सध्या महाराष्ट्र धर्म वाचवण्याची गरज आहे. असे मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच ‘सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असे ट्विटही संदिप देशपांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *