Sun. Oct 17th, 2021

रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही, शिवसेनेवर टीका

राज ठाकरेंनी गुरुवारी महाअधिवेशनात सरकारवर सडकून टीका केली. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी नाव न घेता शिवसेनेवर टीका केली.

राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असे होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो.

माझी मतंही तीच आहे जी पूर्वीपासून होती, असे सांगताना,रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाव न घेता शिवसेनेला गुरूवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात लगावला.

या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले गेले.

अधिक वाचा : …म्हणून पक्षाचा झेंडा बदलला – राज ठाकरे

झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असे होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो,माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून आहे.रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव न घेता टोला लगावला.

दरम्यान बाहेरील देशातील घुसखोर मुस्लिमांना देशातून हाकलण्यासाठी मनसे ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढणार आहे.

संबंधीत बातम्या : …तर पदावरुन हकालपट्टी करण्यात येईल – राज ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *