Fri. Sep 30th, 2022

ममता बॅनर्जींच्या आंदोलनाला मनसेप्रमुख राज ठाकरेंचा पाठिंबा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे.

या आंदोलनाला देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून पाठिंबा मिळत आहेत.

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

ममता बॅनर्जी यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

”केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात मा. ममता बॅनर्जी यांनी जो आवाज उठवला आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो,” असे राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

”राज्य सरकारला विश्वासात न घेता, सीबीआयने कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांच्या घरावर छापेमारी केली.

सीबीआयची स्वायत्तता संपुष्टात यावी यासाठी अलोक वर्मा प्रकरणात पंतप्रधान मोदींनी जे प्रकार केले ते देशाने पहिले.

पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न करू नये.

आपला देश संघराज्य आहे आणि राज्यांच्या अधिकारांवर घाला घालण्याचा कोणताही अधिकार केंद्र सरकारला नाही हे भाजप सरकारने विसरू नये.”असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.