मनसेची लोकसभेसाठी तयारी; मनसे नेत्यांची कृष्णाकुंजवर बेैठक
Jai Maharashtra News
सध्या लोकसभा निवडणुका काही महिन्यातच असल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णाकुंजवर मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज ठाकरे लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्याबरोबर रहातील असे वाटत नाही म्हणून मनसेला महागठबंधनमध्ये स्थान नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर पर्यायांचा विचार करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे समजते आहे.
मनसे आणि महागठबंधन ?
मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा केली जात होती.
मात्र शरद पवारांनी या चर्चेला पूर्णविराम लावला आहे.
निवडणुकापर्यंत राज ठाकरे आमच्याबरोबर राहतील असे वाटत नसून महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.