Wed. Jan 19th, 2022

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

  मनसेप्रमुख राजठाकरे अनेक दिवसांपासून विविध शहरांचे दौरे करत होते. मात्र मास्क न वापरून दौरे करणे राज ठाकरेंना चांगलेच महागात पडले आहे. आज राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षण जाणवत असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. राज साहेब ठाकरे यांना कोरोनाबाधा झाली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

मास्क न घालणारे आणि मास्क न घालण्याचे आवाहन करणारे राज ठाकरे आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. राज ठाकरे आणि त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांचा दोघांचाही कोरोना अहवालसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. सौम्य लक्षण जाणवल्यामुळे राज ठाकरे घरीच उपचार घेणार आहेत. कोरोनाची लागण झाल्यामुळे राज ठाकरे लिलावती रुग्णालयात तापासासाठी गेले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या एका सदस्यालासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

  भांडुप येथे शनिवारी, तसेच पुण्यात रविवारी राज ठाकरेंच्या उपस्थित मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे आयोजित मेळावा रद्द करण्यात आला आहे.

आरोग्य विश्लेषक डॉ. अविनाश बाणाईत यांचा सल्ला 

‘कोरोना या व्हायरल विषाणूचा प्रादुर्भाव श्रीमंत असो वा गरीब, कोणालाही होऊ शकतो. आपली आरोग्य प्रतिकारकशक्ती चांगली असेल तर आपल्याला कोरोनावर मात करता येते. मी कोरोनाविरुद्ध लसीकरणाला फार महत्त्व देतो. कोरोना लसीकरणाचे दोनही डोस होऊनही कोरोनाची लागण झाली तर ती सूक्ष्म प्रमाणात होते. कोरोनाबाधित रुग्णाला कोणताही आजार, मधुमेह, किडनी लिव्हरचे त्रास नसतील तर रुग्ण कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन करत नसतील तर रुग्णाला मुळीच घाबरण्याची गरज नाही. जर १ लाख नागरिक कोरोनाबाधित असतील तर त्यातील ९९, ९९८ रुग्ण कोरोनावर मात करू शकतात. कोरोनावर कोणतेही उपचार नाही. आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल कोरोनाला घाबरायचे कारण नाही. लसीकरण घेणे कोरोनापासून वाचण्याचा उपाय आहे. जर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु कोरोनाचा फैलाव होऊ नेय म्हणून १४ दिवस कॉरंटाईन राहणे गरजेचे आहे. व्हॅक्सीनेशन आणि इनेफेक्शन यादोन्ही गोष्टींनी रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढते. लसीकरण घेतले तर कोरोनाला घाबरायचे कारण नाही.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *