Jaimaharashtra news

…तर पदावरुन हकालपट्टी करण्यात येईल – राज ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर भाषण केलं. यावेळेस त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तंबी दिली.

राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक बदलांसाठी काही सूचना केल्या. पक्षाच्या, पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत फेसबुक, ट्विटर यासारख्या समाजमाध्यमांवर काही जण व्यक्त होतात.

त्यामुळे संघटनात्मक पक्षाच्या बाबतीत कोणतीही बाब मला सोशल मीडियावर आलेली चालणार नाही, असे राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितलं.

पक्षातील वरिष्ठांशी संवाद साधा

तुम्हाला जर व्यक्त व्हायचं असेल, एखाद्या व्यक्तिबद्दल बोलायचं असेल तर पक्षातील नेत्यांकडे सांगा. असे राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले.

सोशल मीडिया ही व्यक्त होण्याची जागा नाही. त्यामुळे मला जर परत असा प्रकार दिसून आला तर त्या संबंधीत पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आपल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी दिला.

पदाचा मान राखावा लागेल

पक्षातील पदाधिकारी हे सारख्याच वयाचे असतात. त्या पदाधिकाऱ्यांचे वय देखील जवळपास सारखीच असतात. असं असलं तरी तुम्हाला पदाचा मान राखावाच लागेल, अशी ताकीद राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिली.

तुमची कामं लोकांपर्यंत पोहचु द्या

वैयक्तिक हेवे दाव्यांपैक्षा तुम्ही केलेली कामं सोशल मीडियावर टाका. तुमची कामं लोकांपर्यंत जाऊ द्यात, असंही राज ठाकरे म्हणाले.

Exit mobile version