Sun. Apr 21st, 2019

अण्णांच्या आंदोलनामुळे आज मोदी सत्तेवर – राज ठाकरे

87Shares

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.

अण्णांच्या उपोषणाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून यापुढे कुठली गोष्ट करु नका असे आवाहन त्यांनी राळेगणमध्ये जमलेल्या उपस्थितांना केले.

अण्णांच्या आंदोलनामुळे आज नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आहेत. खरे तर केजरीवालांनी आज इथे यायला पाहिजे होते असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

18 डिसेंबर 2013 रोजी नरेंद्र मोदी यांनी टि्वट केले होते. लोकपालची नियुक्ती झाली पाहिजे. आज 5 वर्ष झाली, लोकपालची नियुक्ती का नाही झाली ? असा सवालही त्यांनी केला.

उपोषण करताना जीवावर बेतेल अस करु नका असा सल्ला राज ठाकरे अण्णांना दिला.

आपण एकत्र येऊ यांना गाडून टाकू असेही राज म्हणाले. अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून लोकपाल, लोकायुक्तासह अन्य मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *