Fri. Dec 3rd, 2021

पक्षातून हकालपट्टी केल्याने आत्महत्येचा प्रयत्न; राज ठाकरेंना भेटण्यासाठी मुंबईत

लोकसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली. महागठबंधनमध्ये स्थान नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर पर्यायांचा विचार करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आले. यावेळी  मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले औरंगाबादचे माजी शहर सहसचिव अभय मांजरमकर आपल्या कुटुंबासह कृष्णाकुंज येथे पोहोचले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अभय मांजरमकर आपल्या कुटुंबसह कृष्णाकुंजवर पोहोचले होते.
काही दिवसांपूर्वी अभय मांजरमकर यांना पक्षातून काढल्यामुळे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही कारवाई पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे आणि आकसापोटी झाली असल्याचं मांजरमकर यांचं म्हणणं आहे. राज ठाकरे यांच्यासमोर आपली बाजू मांडण्यासाठी अभय यांनी आपली आई, पत्नी आणि दोन मुलांना घेऊन मुंबईत आले आहेत. तसेच कृष्णाकुंजमध्ये प्रवेश करण्याचा त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यांना कुणीही आत घेत नसल्याचे समजते आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *