Tue. Sep 29th, 2020

मनसेच्या ‘या’ पदाधिकाऱ्यावर ऐट्रोसिटीचा गुन्हा दाखल

मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षवर्धन जाधव harshavardhan jadhav Atrocity यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी दलित समाजातील व्यक्तीला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

नक्की प्रकरण काय ?

हर्षवर्धन जाधव यांच्या प्लॉट शेजारी एका व्यक्तीने टपरी टाकली होती. ही टपरी हटवण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी शिवीगाळ केली होती.

या विरोधात हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. औरंदाबादमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केला होता.

हर्षवर्धन जाधव यांची काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील कन्नड आणि सिल्लोडच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

याबाबतचे ट्विट मनसेच्या अधिकृत खात्यावरुन केलं होतं.

हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तसेच केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे पाटील यांचे जावई आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *