‘रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश’

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासादायक चित्र दिसत आहे. मात्र, कोरोनाच्या यश-अपयशावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकारला सरकारला सवाल केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने टाळेबंदीचा निर्णय घेतला होता. टाळेबंदीचे परिणाम आता दिसून येत असून, रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबई आणि राज्यातील परिस्थितीवर समाधान व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

‘आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे. त्याचं श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाचं यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसारमाध्यमं कशी घेऊ शकतात?’, असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

Exit mobile version