Tue. Jun 28th, 2022

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनावर मनसेचा चिमटा

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकरला आहे. तर त्यांच्यासोबत ४० आमदार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, शिंदे यांचा बंड अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असल्याचे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी चिमटा काढला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट केले की, ‘चाळीसच्यावर आमदार सोडून गेले, त्या विरोधात कुठेही शिवसैनिकांमध्ये उद्रेक नाही. अजून किती स्पष्ट सांगायचं. पूर्वी राजा वेषांतर करून स्वत:बद्दलची मत जाणून घ्यायचे. एकदा तसं करून बघा, जनतेच्या भावना नक्की समजतील, मराठी माणूस भावनिक आहे, पण मूर्ख नाही.’

शिवसैनिक म्हणाला तर पक्षप्रमुख पदही सोडेन’

स्वकीयांचे वार जास्त वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे. माझा राजीनामा तयार आहे. शिवसैनिक म्हणाला तर पक्षप्रमुख पदही सोडेन, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री पद सोडण्याचे मी नाटक करत नाहीए, मात्र माझ्यानंतर मुख्यमंत्री शिवसैनिकच असला पाहिजे, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

संदीप देशपांडे यांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, त्याशिवाय जेव्हा अजानच्या विरोधात हनुमान चालीसा लावायला सांगितलं होत तेव्हा त्याचा विरोध करण्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच स्व. बाळासाहेब यांनीसुद्धा अजान बंद व्हायला पाहिजे होती असे सांगितले होते. तरीसुद्धा विरोध करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. हे तुमच हिंदुत्व आहे का असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.