Wed. Jun 16th, 2021

मनसेचा महामोर्चा रविवारी, मनसैनिक सज्ज

मनसेच्या बहुप्रतिक्षित मोर्च्याला अवघे काही तास शिल्लक आहे. मनसेकडून काढण्यात येणाऱ्या या मोर्च्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

देशात असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तानमधील घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी या मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं आहे. गोरेगावमध्ये २३ जानेवारीला झालेल्या अधिवेशनात मोर्चा काढणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती.

मोर्च्याला मोर्च्याने उत्तर देणार असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले होते.  

……या मार्गावरुन निघणार मोर्चा

मनसेचा हा मोर्चा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावरून काढण्यात येणार आहे. या मोर्च्याला रविवारी दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे.

मनसेला  जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मार्गावरुन मोर्चा काढायचा होता. परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी या मार्गावरुन मोर्चा काढण्यासाठी परवानगी नाकारली.

या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात सामील व्हा, असे आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. तसेच या मोर्च्याचा पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता.

आपण आणखी किती दिवस गाफील राहणार, असा सवाल देखील या व्हिडीओतून केला आहे.

मोर्च्यासाठी मनसे सज्ज

रविवारच्या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी अनेक मनसैनिक उत्सुक आहेत. केवळ मुंबईच नाही तर, ठाणे, भिवंडी, नाशिक या आणि विविध जिल्ह्यातून अनेक मनसैनिक मुंबईत पोहचणार आहेत.

मनसेच्या मोर्च्याबदद्ल लोकांना माहिती व्हावी यासाठी चौकाचौकात बॅनर लावण्यात आले आहे. तसेच दारोदार जाऊन पदाधिकाऱ्यांकडून मोर्च्याची माहिती दिली आहे.

मोर्च्यासाठी नाशिकहून मुंबईत जवळपास १० हजार झेंडे पाठवले आहेत.

मोर्च्यासाठी स्पेशल टीशर्ट देखील छापण्यात आले आहेत.

सहभाग घेणाऱ्यांना आवाहन

या मोर्च्यात सहभागी होणाऱ्यांना मनसेने ट्विटद्वारे सूचना दिली आहे. गिरगाव चौपाटी इथं पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

पदाधिकाऱ्यांच्या बैठका

या मोर्च्यासाठी जवळपास १० दिवसांपासून तयारी केली जात आहे. यासाठी राज ठाकरे यांनी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका देखील घेतल्या होत्या. 

अधिक वाचा : ‘या’ मार्गावरुन निघणार मनसेचा मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *