Sat. May 25th, 2019

इंजिनाचा एकमेव डबा शिवसेनेच्या वाटेवर …

575Shares

लोकसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खूप मोठा धक्का बसला आहे.

नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनावणे हे उद्या शिवसेनेत प्रवेश  करणार आहेत.

उद्या दुपारी 2 वाजता सोनावणे मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करतील.  दादरच्या शिवसेना भवनमध्ये ही प्रक्रिया पार पडेल.

उद्या  सोनावणे सेना भवनामध्ये जवळपास 10 हजार कार्यकर्त्यां सोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

शरद सोनावणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानमतदारसंघातून आलेले मनसेचे आमदार आहेत.

मनसेला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकांच्या आधीच मनसे ला खूप मोठा धक्का बसला.

मनसेचे आमदार शरद सोनावणे हे उद्या दुपारी 2 वाजता सोनावणे मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करतील.

शरद सोनावणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानमतदार संघांतून आलेले मनसेचे आमदार आहेत.

सोनावणे 10 हजार कार्यकर्त्यांसोबत जुन्नर ते सेना भवन असं शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यामध्ये जवळपास 1 हजार चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

2014 साली विधानसभा निवडणकीच्या वेळेस शिवसेनेत उमेदवारी नाकारल्यानं शरद सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता.तसेच ते जिंकूनही आले होते.

एकीकडे 2014 मध्ये मनसेचा सुफडा साफ असताना एकमेव शरद पवार  निवडून आले होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *