Wed. Oct 5th, 2022

मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा फोटो ट्विट

मनसेच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पार पडलेल्या सभेत केला. दरम्यान, मनसे नेत्यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते बृजभूषण सिंह यांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये बृजभूषण आणि शरद पवार तसेच सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यामागे शरद पवारांचा हात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

मनसे नेते गजानन काळे आणि सचिन मोरे यांनी बृजभूषण सिंह यांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करताना सचिन मोरे यांनी लिहिले की, ‘कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…’

तसेच, गजानन काळे यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘ब्रिजचे निर्माते…सुज्ञास अधिक सांगणे न लगे, (फोटो झूम करन पाहावा…)’. तर हा फोटो २०१८सालचा मावळमधील एका कार्यक्रमातील असल्याची माहिती गजानन काळे यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला शरद पवारांचा विरोध असल्याची चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.