Thu. Jun 17th, 2021

मुंबई महापालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मनसेचा मोर्चा

मनसेच्या वतीने आज फेरीवाला धोारणाविरोधात मोर्चा काढण्यात आला. मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगड ते जी वॉर्डपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

राजगड या मनसेच्या मुख्यालयापासून या मोर्च्याला सुरुवात झाली.

या मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक आणि मनसैनिकांची उपस्थिती होती. राजगड या मनसेच्या मुख्यालयापासून या मोर्च्याला सुरुवात झाली.

यासाठी  काढण्यात आला मोर्चा ?

मुंबई महानगरपालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मनसेने हा मोर्चा काढला. महापालिकेच्या फेरीवाला धोरणानुसार महापालिकेने फेरीवाल्यांसाठी काही अनेक ठिकाणं ठरवण्यात आली.

यामध्ये  राजगड या मनसेच्या कार्यालयासमोरील फुटपाथचाही समावेश आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या धोरणानुसार फेरीवाल्यांना राजगड समोरील फुटपाथवर बसण्याची मुभा मिळाली आहे. या विरोधात मनसेने हा मोर्चा काढला.

मनसे सुरुवातीपासूनच फेरीवाल्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. एलफिन्सटन दुर्घटनेनंतर मनसेने दादर रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांविरोधात मनसेने आंदोलन छेडले होते.

जो पर्यंत या निर्णयावर तोडगा निघत नाही, तेव्हा पर्यंत फेरीवाल्यांना बसू देणार नाही. अशी ठाम भूमिका मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी घेतली.  तसेच महापालिकेने फेरीवाला धोरण लागू केलं तर, मोठा संघर्ष होईल, असं ही मनसेतर्फे सांगण्यात आलं. 

फेरीवाले या ठिकाणी बसणार

भागोजी किर रोड

धारावी 60 फूट रोड

माहिम एम.एम.सी रोड

माहीम सुनावाला अग्यारी रोड

पंडित सातवडेकर मार्ग : 100 फेरीवाले

व्ही.एस.मटकर मार्ग

व्ही.एस.मटकर मार्ग

शितलादेवी रोड

पद्माबाई ठक्कर रोड

एन.सी.केळकर रोड

सेनापती बापट मार्ग

बाबुराव परुळेकर मार्ग

गोखले रोड

दरम्यान राज ठाकरे गुरुवारपासून ३ दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

तसेच अवघ्या काही दिवसांपूर्वी मनसेने पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढला होता. याचा परिणाम पाहिला मिळाला. विरारमध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या एकूण २३ जणांना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *