Tue. Jun 28th, 2022

राज ठाकरे यांची ‘या’ दिवशी पहिली प्रचारसभा

त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे असे म्हणाले की, नरेंद्र पाटील हे पक्षातर्फे निवडणूक लढवणार आहे.

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर ठेपली असून सर्व राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत. विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेत स्पष्ट केल्यानंतर मनसे सुद्धा विधानसभेसाठी तयारीला लागली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यात राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’  अशा प्रचारसभा घेतल्या. आता पुन्हा राज ठाकरे विधानसभेसाठी प्रचारसभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर विष प्राशन करत आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हणाले आहे.

राज ठाकरे विधानसभेसाठी सज्ज –

लोकसभा निवडणुकांवेळी संपूर्ण देशात चर्चेत असणारा राजकीय नेता राज ठाकरे ठरले होते.

लाव रे तो व्हिडीओ यामुळे संपूर्ण देशात फक्त राज ठाकरेंच्या प्रचारसभेची चर्चा सुरू होती.

आता पुन्हा विधानसभेसाठी राज ठाकरे प्रचार सभा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

येत्या 5 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे प्रचारसभा घेणार असल्याचे समोर आले आहे.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रचार सभा घेणार असल्याचे जाहीर केले.

गेल्या अनेक दिवसांपासून जे काही बोललो नाही ते आता बोलणार असल्याचे म्हणाले.

प्रचारसभेत महाराष्ट्राच्या जनतेसमोर सगळं काही सांगणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.