Thu. Sep 19th, 2019

महागाईविरोधात मनसेचं अनोख आंदोलन

0Shares
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
 
पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढी विरोधात मनसेनं आज नाशिकमध्ये आंदोलन केलं. पेट्रोल परवडत नसल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बैलगाडी, घोडे यावर बसुन मोर्चा काढला. तसंच नोकरीचं स्वप्न दाखवणा-या पंतप्रधानांमुळे तरुणांवर भजे तळण्याची वेळ आल्याचं सांगत मनसे कार्यकर्त्यांनी भजे तळत प्रतिकात्मक आंदोलन केलं.
 
गेल्या अनेक दिवसांपासुन वाढत असलेल्या महागाईविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. नाशिकच्या मनसे कार्यालयाबाहेर यावेळी अभिनव आंदोलन करण्यात आलं. मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेरुन मनसे कार्यकर्त्यानी घोडे,उंट,बैलगाडी यावर बसुन मोर्चा काढला. येणा-या काळात पेट्रोल परवडणार नसल्यानं आता लोकांनी पुर्वीप्रमाणे या जनावरांचा वापर करण्याची वेळ आली आहे असं म्हणत हे आंदोलन करण्यात आलं आहे.
 
दुसरीकडे नोकरीचं स्वप्न दाखवुन तरुणांना भजे तळायचा सल्ला देणा-या पंतप्रधानांचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावरच भजी तळून प्रतिकात्मक आंदोलन केलं. यावेळी टाळ मृदुंग वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *