Jaimaharashtra news

मनसे शॅडो कॅबिनेटची ९ मार्चला होणार घोषणा

मनसेच्या बहुप्रतिक्षित शॅडो कॅबिनेटची घोषणा सोमवारी 9 मार्च रोजी करण्यात येणार आहे. तसेच मनसेचा 9 मार्चला 14 वा वर्धापन दिन आहे.

हा 14 वा वर्धापन दिन वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात येणार आहे.

मुंबईतील गोरेगाव येथे 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवशेन सोहळा पार पडला.

या महाअधिवेशनादरम्यान शॅडो कॅबिनेटची स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

शॅडो कॅबिनेट कशासाठी ?

सरकारमधील संबंधित विभागाच्या मंत्र्याच्या कारभारावर मनसे शॅडो कॅबिनेटद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. या शॅडो कॅबिनेटपदी मनसेच्या नेत्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची वर्णी लागू शकते.

दरम्यान 9 तारखेला होणार मनसेचा वर्धापन दिन हा मनसेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई बाहेर होत आहे.

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?

त्यामुळे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नक्की काय होणार, याकडे सर्वांची नजर असणार आहे.

Exit mobile version