Sat. Jun 12th, 2021

‘मिशन मंगल’ मराठीत प्रदर्शित झाला तर ‘मिशन खळ्ळखटॅक’ हाती घेऊ – मनसे

मिशन मंगल हा हिंदी चित्रपट मराठीमध्ये डब करुन प्रदर्शित करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे.

मिशन मंगल हा हिंदी चित्रपट मराठीमध्ये डब करुन प्रदर्शित करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. हिंदी सिनेमे मराठीत डब करण्याने मुळ मराठी चित्रपट मागे पडतात असं मनसेचे म्हणणं आहे. त्यामुळे त्यांचा मिशन मंगल चित्रपटास विरोध आहे. हा चित्रपट हिंदीतून प्रदर्शित होण्यास आमचा विरोध नाही असंही मनसेने म्हटलं आहे.

मिशन मंगलला मनसेचा विरोध

गेली अनेक वर्ष मराठी चित्रपटांना शोज मिळावेत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन सुरू आहेत.

त्याचप्रकारे अन्य भाषेतील चित्रपट मराठीत डब करुन प्रदर्शित केल्याने मुळ मराठी चित्रपटाला शो मिळणार नाहीत म्हणून यालाही मनसेचा विरोध आहे.

महाराष्ट्रातील लोकांना हिंदी समजण्यात काही अडचण नाही, त्यामुळे हिंदी चित्रपट मराठीत डब करण्याची गरज नाही असं ही मनसेचे म्हणणे आहे.

थिएटरमालकांचा वर्षभरातील मराठी सिनेमांच्या शोजचा कोटा पूर्ण व्हावा म्हणून हे केलं जात आहे. असा आरोपही मनसेने केला आहे.

या आधी धोनी चित्रपटास डब करून प्रदर्शित करण्यास मनसेने विरोध दर्शवला होता आणि आता मिशन मंगल या चित्रपटास विरोध राहील असा इशारा देण्यात आला आहे.

मराठी चित्रपटसुष्टी आधीच अडचणीत आहे. त्यामुळे आंदोलन केले जाणार आहे असं मनसेचं म्हणणं आहे.

‘मिशन मंगल’ मराठीत प्रदर्शित करण्यात आला तर आम्हाला ‘मिशन खळ्ळखटॅक’ हाती घ्यावं लागेल. असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *