Tue. Jan 18th, 2022

प्रत्येक जातीचा माणूस हिंदवी स्वराज्यासाठी…, मनसेने ट्विट केला व्हिडिओ

महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हिंदुत्वाची कास धरणार का, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान मनसेने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

ट्विट केलेला व्हिडिओ १६ सेकंदांचा आहे. व्हिडिओत शिवाजी महाराजांची आकृती दिसत आहे. ‘हिंदवी स्वराज्य’असा हॅशटॅग या व्हिडियोसाठी वापरला आहे.

पोस्ट केलेल्या व्हिडिओला राज ठाकरे यांचा आवाज आहे.

‘महाराजांच्या आजपर्यंतच्या सगळ्या लढाया आपण पाहिल्या तर प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक जातीचा माणूस हिंदवी स्वराज्यासाठी लढत होता’ असे या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.

गुरुवारी म्हणजेच 23 जानेवारीला मनसेचं राज्यवापी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाकडे राजकीय पंक्षासह अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

मनसे नक्की काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहेत.

तसेच या अधिवेशनातून मनसे आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार आहे.

दरम्यान सोमवारी मनसेच्या अधिकृत फेसबूक आणि ट्विटर खात्यावरुन जुना झेंडा गायब झाला. मनसेचं रेल्वे इंजिनच्या मागे असलेल्या ४ रंगाचे झेंडे वगळण्यात आले आहे.

तर रेल्वे इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता मनसेचा झेंडा नक्की कसा असेल,याबद्दच्या चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *