Sat. May 25th, 2019

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही

278Shares

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्ष आपली उमेदवारांची यादी जाहीर करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा लढवणार नसल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुक लढवणार नसल्याची माहिती पक्षाचे नेते शिरिष सावंत यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे. या पत्रकात 19 मार्च रोजी होणाऱ्या मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलणार असल्याचे म्हटलं आहे.

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही –

राज ठाकरे यांनी 13व्या वर्धापन दिनी लोकसभा निवडणुकांबाबत नंतर बोलेन असं म्हटलं होतं.

मात्र आता सर्वांनाच समजले आहे की, मनसे यंदाची निवडणुक लढवणार नाही.

19 मार्चला  मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटलं जात आहे.

त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे यांची काय भूमिका असेल यावर सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *