Wed. Oct 27th, 2021

मनसेचे निवडणूक आयोगाला पत्र; शहरांच्या रस्त्यांवर प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर ठेपली असून राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी सज्ज झाली आहेत. मात्र अवेळी पाऊस पडत असल्यामुळे मैदानात चिखल होत असल्याने सभा घेण्यास अडचण होत आहे. त्यामुळे शहरांमधील रस्त्यांवर जाहीर सभा घेण्यास परवानगी मिळावी असे पत्र मनसेने निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

मनसेने का पाठवले निवडणूक आयोगाला पत्र ?

राज्यात विधानसभा निवडणूक काही दिवसांवर असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष प्रचारासाठी सज्ज झाली आहेत.

मनसे सुद्धा विधानसभेच्या प्रचारासाठी सज्ज झाली आहेत.

मात्र यापूर्वी सभा घेण्यासाठी जागा मिळत नव्हती तर आता परतीच्या पावसामुळे सभा रद्द करावी लागली.

त्यामुळे मनसेने निवडणूक आयोगाला शहरांमधील रस्त्यांवर सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

मैदानात अवेळी पाऊस पडल्यानंतर चिखल होते आणि त्यामुळे सभा घेण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे या पत्रात म्हटलं आहे.

मनसेने आपली पहिली सभा पुण्यात आयोजित केली होती.

मात्र परतीचा पावसामुळे पुण्यातील सभा रद्द करण्यात आली.

तसेच आज मुंबईत सांताक्रुझमधील मराठा कॉलनीत आणि दुसरी सभा गोरेगावच्या आझाद मैदानात सभा होणार आहे.

मात्र आजही पावसाचे सावट असल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चिंता आहे.

लोकसभा निवडणुकांदरम्यान लाव रे तो व्हिडीओ यामुळे राज ठाकरे यांच्या प्रचारसभा चांगल्याच गाजल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *