Thu. Sep 29th, 2022

मनसेचा ठाकरेंना टोला

शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी आवाजात चर्चा सुरू आहे. या चर्चेमुळे मनसेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

एकही टीकेची संधी न सोडणारे संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी संदीप देशपांडे यांनी सूपर 30 या हिंदी सिनेमातील डॉयलॉग म्हणून देशपांडे टोला लगावला. अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा त्याचा मतितार्थ आहे. बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे पुढे घेऊन जाणार आहेत, बाकी कुणीही नाही, असा दावाच देशपांडेंनी केला आहे. हिंदुत्व, मराठी माणसाचा, विकासाचा विचार असेल तो राज ठाकरेच पुढे नेत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर कुणाचाही मालकी हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही आचरणात आणले का? असा सवालच देशपांडेंनी केली.

बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबतच तुम्ही व्यवहार केला. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र मागतात यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. शिवसेनेवर आलेल्या या वेळेचं क्रेडिट उद्धव ठाकरेंना जातं, अशी टीका संदीप देशपांडेंनी केली. केमिकल लोचा कुणाचा झालाय हे स्पष्ट होतंय. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी काय काय काम केलं याची आता केंद्र चौकशी करणार आहे.  त्यात काही गैर असेल तर चौकशी झाली पाहिजेच, असंही देशपांडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.