Fri. Jul 30th, 2021

मोबाईलचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी

अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये लहान मुलांच्या बाबतीत अशा घटना वारंवार घडत आहेत. लहान मुलांना मोबाईल वरती गेम खेळण्याचे खास आकर्षण असते. ते तासंसात मोबाईलवर गेम खेळत असल्याने हे प्रकार लहान मुलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात घडत आहेत. वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील घोडके वस्तीवर असाच प्रकार उघडकीस आला आहे. मोबाइलच्या बॅटरीचा स्फोट होऊन दोन बालके यामध्ये गंभीर जखमी झाली आहेत. सोमवारी सकाळी 9.00 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी असाच एक स्फोट नांदेड मधील जिरगा गावात गेम खेळत असताना घडला होता. यामध्ये आठ वर्षांच्या मुलाच्या हाताची पाचही बोटे तुटली होती.

नेमकं काय घडलं?

मोबाइलची बॅटरी मोबाइलच्या बाहेर काढून खेळत असताना बॅटरीचा स्फोट होऊन दोन बालके गंभीर जखमी झाली.

कृष्णा रामेश्वर जाधव वय ( 8 ) आणि कार्तिक रामेश्वर जाधव वय ( 5 ) या बालकांची नावे आहेत.

वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील घोडके वस्तीवर सोमवारी सकाळी 9.00 वाजता हा प्रकार घडला.

या घटनेत दोन्ही बालकांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

या दोघांवर सुरुवातीला शिवूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात होते.

अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

अशा घटनांमध्ये वारंवार वाढ होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *