Sat. Nov 27th, 2021

पश्चिम रेल्वेच्या ‘या’ स्थानकांवर मोबाईल चार्जिंगची सुविधा

मोबाईल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलशिवाय एक दिवसही आपण राहू शकत नाही.

प्रवासादरम्यान अनेकदा मोबाईलची चार्जिंग संपल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पश्चिम रेल्वेने ही माहिती ट्विट करुन दिली आहे.

पश्चिम रेल्वेच्या 14 स्थानकांवर चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या 14 स्थानकांवर मोबाईल चार्जिंग पॉईंट उभारण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे हे चार्जिंग पॉईंट वीजेवर चालणारे नसून सौरऊर्जेवर चालणारे आहेत.

या मोबाईल चार्जिंग पॉईंटमध्ये एका वेळेस 8 मोबाईल चार्जिंग करण्याची सोय आहे.

तसेच दिवसभरात 100 पेक्षा अधिक मोबाईलना चार्जिंग करता येणार आहे.

या स्थानकांवर असेल ही सुविधा

पालघर, बोईसर, विरार, नालासोपारा (पश्चिम), वसई रोड (पश्चिम), कांदिवली (पश्चिम), अंधेरी (पश्चिम), सांताक्रुझ, दादर, लोअर परळ, मुंबई सेंट्रल, ग्रॅण्ट रोड आणि चर्चगेट या स्थानंकावर प्रत्येकी 1 मोबाईल चार्जिंग पॉईंट बसवले आहे.

तर बोरिवली स्थानक पूर्व आणि पश्चिम स्थानकावर प्रत्येकी 1 मशीन बसवण्यात आल्या आहेत.

त्यामुळे आता पश्चिम रेल्वेमार्गावर प्रवास करताना बॅटरी लो झाल्यास काळजी करण्याची गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *