Mon. Jan 25th, 2021

प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघावर मोची समाज आणि मुस्लिम समाजाचा दावा!

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर मोची समाज आणि मुस्लीम समाजाने दावा केला आहे. मुस्लिम समाजाने थेट अखिल भारतीय कॉंग्रेस समितीकडे उमेदवारीची मागणी केल्याने आमदार शिंदे यांच्यासमोर मोठ आव्हान उभं राहणार आहे.

कुणाला मिळणार उमेदवारी?

विधानसभा निवडणुकीत जो पक्ष उमेदवारी देईल त्या पक्षाला पाठिंबा द्यायचा असा निर्णय जांबमुनी समाजाच्या बैठकीत झाला आहे.

अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या पाठिशी असलेल्या मोची समाजाने यंदा आक्रमक भूमिका घेत सोलापूर शहर मध्य या मतदारसंघावर दावा केला.

सध्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

हक्काच्या पाठिराख्या समाजाने बंडाच्या झेंडा उचलल्याने आमदार शिंदे यांना मोठा धक्का बसलाय.

अशातच दुसरी हक्काची व्होट बॅंक असलेल्या मुस्लीम समाजानेही या मतदारसंघावर दावा केलाय.

यामुळे आमदार शिंदे यांच्यासमोरील अडचण वाढली आहे.

या मतदारसंघात मोची समाजाचे सुमारे 40 हजार, तर मुस्लीम समाजाचे सुमारे 85 हजार मतदार असल्याचा दावा केला जातोय.

हे दोन्ही समाज काँग्रेसचे हक्काचे मतदार आहेत. त्यामुळे मोची समाजाबरोबर मुस्लीम समाजानेही दावा केल्याने या मतदारसंघातील उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *