आयएनएस विराटचे तोडकाम सुरू
जहाज तोडण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा त्याचे भाग जोडणे अशक्य…

आएनएस विराट भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर या विमानवाहू नौकेचे रुपांतर संग्रहालयात करण्याचे नियोजित होते. मात्र, आता या जहाजाचे तोडकाम सुरू असून संग्रहालय बनविण्याच्या आशा मावळतीला गेली आहे. महाराष्ट्र सरकारने या जहाजाचे संग्रहालयात रुपांतर करण्याची तयारी दर्शवली होता. मात्र, आता हे जहाज तोडण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा त्याचे भाग जोडणे अशक्य दिसत आहे. तोडकाम सुरू, संग्रहालय बनविण्याची आशा मावळतीला गेली आहे. शिवाय आएनएस विराट ही नौवका निवृत्त पुर्वी देखील चर्चेत होती आणि निवृत्त झाल्यानंतर सुद्धा चर्चेत आहे.