Tue. Aug 20th, 2019

मोदींसह कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा प्रवासांवर ‘एवढा’ खर्च!

0Shares

पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी मागील 5 वर्षात परदेश आणि देशांतर्गत प्रवासांवर एकूण 393 कोटी 57 लाख 51 हजार 890 रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना देण्यात आली आहे.

RTI च्या माहितीतून काय समोर आलं?

गलगली यांनी RTI च्या माध्यमातून कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खात्याकडे माहिती मागितली.

या विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक खर्च परदेशी प्रवासांवर झालाय.

एकूण खर्चाची रक्कम 292 कोटी आहे तर देशातंर्गत प्रवासांवर 110 कोटी खर्च झालेला आहे.

कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाचे वरिष्ठ लेखा अधिकारी सतीश गोयल यांनी 2014- 2015 पासून 5 वर्षांत परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची आकडेवारी दिली.

यात कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या खर्चाचा समावेश आहे.

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नाही.

गेल्या 5 वर्षात कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर एकूण 262 कोटी 83 लाख 10 हजार 685 रुपये खर्च करण्यात आले.

देशांतर्गत प्रवासांवर एकूण 48 कोटी 53 लाख 9 हजार 584 रुपये खर्च झाले.

राज्यमंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर 29 कोटी 12 लाख 5 हजार 170 रुपये खर्च करण्यात आले.

देशांतर्गत प्रवासांवर 53 कोटी 9 लाख 26 हजार 451 रुपये खर्च झाले आहेत.

अनिल गलगली यांच्या मते परदेश आणि देशातंर्गत प्रवास मोठ्या प्रमाणात झाला असून एकूण खर्चाची माहिती अभिलेखावर आहे पण कोणत्या मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी किती प्रवास केला आहे त्याचे विवरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. याचे विवरण केंद्र शासनाने सार्वजनिक करायला हवं अशी त्यांची मागणी आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *