Mon. Oct 25th, 2021

मोदी आणि राज ठाकरे एकत्र?

2014 पूर्वी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना (Narendra Modi) समर्थन देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नंतरच्या काळात आपली भूमिका बदलली. ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी-शहा यांच्यावर आक्रमकपणे आणि पद्धतशीर टीका करणारे राज ठाकरे हे भाजपचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. मात्र सध्या पालघर मधील वाडा तालुक्यात मोदी आणि राज ठाकरे एकाच बॅनरवर दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.

पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे.

7 जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे.

मात्र वाडा पंचायत समितीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती असल्याने मोदी आणि राज ठाकरे यांचे एकाच बॅनरवर फोटो लागले आहेत.

त्यामुळे सध्या जिल्ह्यात हा विषय चर्चेचा बनला असून स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना काहीही करू शकते असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय.

तर ही युती नसून गाव पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समजुतीने झालेला तोडगा आहे, असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलंय. तसंच हे बॅनर्स मनसेने नव्हे, तर भाजपने लावल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *