Sun. Apr 21st, 2019

पवार तुम्ही विदेशी चष्म्यातून भारताला पाहताय; मोदींचा शरद पवारांना टोला

285Shares

लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींनी सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, सुजय विखे पाटील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली असून शरद पवारांवरही पुन्हा टीका केली आहे. तसेच 23 मेनंतर पुन्हा भाजपाचे सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

मागील पाच वर्षात मजबूत निर्णय घेणारं सरकार जगानं पाहिलं

यूपीएचं सरकार घोटळेबाज सरकार

तुम्हाला प्रामाणिक चौकीदार हवा की भ्रष्टाचारी ? असा प्रश्न उपस्थितींना विचारला.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी फुटीरतावाद्यांसोबत उभे राहतात.

पवार तुम्ही विदेशी चष्म्यातून भारताला पाहताय

कॉंग्रेस – राष्ट्रवादीला 2 पंतप्रधान हवे आहेत

दोन पंतप्रधानांच्या मुद्यावर कधीपर्यंत गप्प राहणार? असा सवाल मोदींनी शरद पवार यांना उपस्थित केला.

जनतेच्या एकतेमुळे मोठे निर्णय घेऊ शकलो असेही त्यांनी म्हटलं आहे.

पुन्हा सत्तेत आल्यास कृषी योजनेत बद्दल करणार

कॉंग्रेस हद्दपार झाली तरच गरीबी हद्दपार होणार

पाण्यासाठी जलमंत्रालय संथापन करणार अशी काही आश्वासने मोदींनी दिली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *