Wed. Jun 19th, 2019

NDA चा सत्तास्थापनेचा दावा, मोदीच होणार पंतप्रधान

0Shares

लोकसभा निवडणुकीत पुन्हा बहुमत मिलवल्यानंतर आता NDA ने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक घेतली. या बैठकीला नरेंद्र मोदी यांच्यासहित भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शाह यांच्यासहित इतर महत्त्वाचे नेते आणि घटक पक्षांचे नेते आणि सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार असे राज्याचे दिग्गज नेतेही या बैठकाली उपस्थित होते.

स्टेजवर  उध्दव ठाकरे, नितीश कुमार,प्रकाश सिंग बादल, रामविलास पासवान, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांसारखे दिग्गज विराजमान होते.

घटक पक्ष शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेदेखील संजय राऊत यांच्यासहित दाखल झाले.

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा संसदीय नेतेपदासाठी प्रस्ताव ठेवला.

प्रस्तावाला राजनाथ सिंह यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर नितीन गडकरी यांनीही मोदी याच्या नावाला अनुमोदन दिलं.

मोदी यांच्या नावाला सर्व भाजप खासदारांनी एकमताने पाठिंबा दिला.
त्यामुळे नरेंद्र मोदी यांची भाजपच्या संसदीय नेतेपदी नियुक्त झाली.
त्यानंतर NDA च्या नेतेपदासाठी  प्रकाश सिंग बादल यांचा मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोदींच्या नावाला  अनुमोदन दिलं.
रामविलास पासवान यांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं.
यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री पनीरसेल्व्हम यांनीही या प्रस्तावाला समर्थन दिलं.
यनंतर मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनीही या प्रस्तावाला समर्थन दिलं.
विविध पक्षाच्या नेत्यांनी मोदींनाच समर्थन दिल्याने त्यांची एकमताने निवड झाली.
यानंतर सभागृहातील NDAच्या सर्व खासदारांनी पाठींबा दिला.
त्यामुळे NDA च्या नेतेपदी नरेंद्र मोदींची एकमताने निवड करण्यात आली.
353 सदस्यांचे नेते म्हणून मोदींची निवड करण्यात आली.
सर्व घटक पक्षांचे आणि खासदारांचे अमित शहा यांनी आभार मानले.

सत्तास्थापनेचा दावा करून नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी निवड करण्यात आली आहे.

पंतप्रधांनाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अमित शहा  यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.

अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासाठी NDA च्या सर्व घटक दलाच्या नेत्यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.
मोदींनी अडवाणींच्या पाया पडून आशिर्वाद घेतले

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: