Mon. Jul 4th, 2022

…तर पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराने नेहमी चिंतेत असणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी काळात पेट्रोलचे दर 10 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत सरकार एक नवी योजना आखत असून पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याचा विचार करत आहे.

नीती आयोगाच्या देखरेखीखाली सरकार देशभरात 15 टक्के मिथेनॉल मिसळलेले पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे. यासाठी पुण्यात चाचण्याही सुरु झाल्या आहेत. जर सरकारच्या या योजनेला यश मिळाले तर पेट्रोल तब्बल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

मिथेलॉनचाच विचार का ?

  • मिथेनॉल कोळशापासून तयार केले जाते, सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळले जाते. इथेनॉल ऊसापासून तयार केले जाते.
  • इथेनॉलसाठी प्रती लीटर 42 रुपये खर्च होतात, तर मिथेनॉलसाठी 20 रुपये प्रती लीटर खर्च येतो.
  • इथेनॉलच्या तुलनेत मिथेनॉल स्वस्त असल्यानेच या पर्यायाचा विचार केला जात आहे. तसेच मिथेनॉलमुळे प्रदूषणही कमी होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.