Thu. Jun 17th, 2021

केंद्राकडून पुन्हा मोफत धान्य वाटपाची घोषणा

संपूर्ण देश कोरोना संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने गरीब आणि कामगार वर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. भारत सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मे आणि जून २०२१ मध्ये मोफत धान्य देणार आहे.देशातील ८० कोटी लाभार्थ्यांना ५ किलो मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. भारत सरकार या उपक्रमासाठी २६ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे.

कोरोनाच्या निर्बंधामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे. या घोषणेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोरोना संकटामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला.

कोरोनाच्या कठीण काळात घरातील चूल विझता कामा नये, या उद्देशाने सरकारने गेल्या वर्षी टाळेबंदी सुरू होताच पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली. या अंतर्गत गरीबांना आर्थिक मदत केली गेली. यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या बँक खात्यात रोख रक्कम तसेच गरीबांच्या स्वयंपाकघरात मोफत रेशन मिळू शकले. एवढेच नाही तर मनरेगाच्या माध्यमातून कामगार वर्गालाही दिलासा मिळाला.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *