पंतप्रधान मोदींचे गुरु स्वामी आत्मस्थानंद यांचं निधन
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींचे गुरु आणि रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. रविवारी रात्री कोलकातामधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
स्वामीजींच्या निधानावर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन आपला शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
स्वामी आत्मस्थानंद यांच्या निधनानं माझं वैयक्तीक मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन दिली. दरम्यान, स्वामी आत्मस्थानंद यांच्यावर आज कोलकाताच्या बेलूर मठात अंत्यसंस्कार होणार आहे.