Wed. Jan 19th, 2022

‘उद्योगपती मित्रांची कामे मोदी लगेच करतात’; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर आरोप

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पत्रकार परिषद घेत निशाणा साधला आहे. कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. ‘सत्ताधाऱ्यांना अहंकार झाला आहे. त्यांच्यात गर्विष्ठपणा आला आहे. त्यांना वाटते आम्ही सत्तेत आहोत तर कुणाचेही ऐकण्याची गरज नाही. त्यांनी माणुसकीही सोडली आहे’, अशा शब्दात काँग्रेस खासदरा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनातील मृतांच्या वारसांना भरीव मदत मिळावी यासाठी दंड थोपटले. केंद्र सरकार मदतीच्या वेळी नेहमी कारण देत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. कोरोना काळात मृत पावलेल्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारने डेटा उपलब्ध नसल्याचे कारण दिले होते आणि आता शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीतही त्यांनी कारणे दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांच्या उद्योगपती मित्रांचे नंबर आहेत. तर आमच्याकडे शहीद शेतकऱ्यांची माहिती आहे. उद्योगपती मित्रांची कामे नरेंद्र मोदी लगेच करत असल्याचा आरोप त्यांनी मोदी सरकारवर लगावला आहे. पंतप्रधानांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी, तसेच त्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी असे राहुल गांधी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *