Sat. May 25th, 2019

‘चौकीदार चोर नही, चौकन्ना है’, मोदींचा टोला

0Shares

काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या अमेठीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. अमेठीमध्ये रायफलनिर्मितीसह इतर अनेक प्रकल्पांचं उद्घाटन मोदींनी केलं. यावेळी ‘चौकीदार चोर है’ची घोषणा देणाऱ्या राहुल गांधी यांना प्रत्युत्तर ‘चौकीदार चोर नही, चौकीदार चोर है’ अशा शब्दांत दिलं.

मेड इन आमेठी

यावेळी बोलताना राहुल गांधींवर मोदी यांनी नाव न घेता टीका केली.

काही लोक ‘मेज इन उज्जैन’, ‘मेड इन जयपूर’, ‘मेड इन जैसलमेर’ च्या घोषणा देत आहेत.

पण ते लोक घोषणाच देत राहतील.

तोपर्यंत भारतीय जवानांच्या हाती ‘मेड इन अमेठी’ AK 203 असतील.

कारण मोदी वेगवान आहे, असं यावेळी ते म्हणाले.

भारत आणि रशियाच्या संयुक्त निर्मितीद्वारे AK-203 या रायफल्स अमेठीमध्ये तयार होणार आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि माझे मित्र व्लादिमिर पुतीन यांच्या सहकार्यामुळे हे शक्य होतंय.

यासाठी मी त्यांचे आभार मानतो.

पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या air strike चा हवाला देत ‘चौकीदार चोर है’ म्हणणाऱ्या राहुल गांधींवर मोदींनी टीका केली.

राफेल विमानं आज असती, तर किती फायदा झाला असता, याचा विचार करा, असं मोदी यावेळी म्हणाले.

राफेल करारात पैसे खाता आले नाही, म्हणून विरोधक आमच्यावर खोटे आरोप करत आहे.

मात्र आता लक्षात आलं असेल, की ‘चौकीदार चोर नही, चौकीदार चौकन्ना है’

गरीबी हटाव

काही जण वर्षानुवर्षं ‘गरीबी हटाव’चा नारा देत आहेत. मात्र गरीबी कायम आहे.

मात्र आम्ही गरीबीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

आम्ही त्यांना ताकद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *