Mon. Jul 22nd, 2019

‘मोदींचा अर्थ’ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय – काँग्रेस प्रवक्ते

35Shares

मोदींचा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा असल्याचे वादग्रस्त विधान काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान केलं आहे.

पवन खेडा यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पवन खेडा यांचे हे वादग्रस्त विधन काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्याता आहे.

भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटरवर मोदींबद्दल केलेल्या विधानाचा मुद्दा उचलला आहे.

एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान पवन खेडा मोदी यांच्यावर आपत्तीजनक वक्तव्य करताना म्हणाले की, मोदी यांचा अर्थ मसूद अजहर, ओसामा, दाऊद आणि आयएसआय आहे.

या चर्चेत भाजपाकडून पक्षाचे प्रवृक्ते संबित पात्रा सामील झाले होते.

पवन खेडा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत ते म्हणाले की, हे आपत्तीजनक वक्तव्य आहे.

देशाच्या पंतप्रधानांची तुलना तुम्ही ओसामा बिन लादेनसोबत कशी करू शकता? असा प्रश्न उपस्थित करत पवन खेडा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

वादग्रस्त वक्तव्यानंतर पवन खेडा ट्विटरवर चर्चेचा विषय होते. हजारो नेटीझन्सही पवन खेडा यांच्याबद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरूनही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. पवन खेडा यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ भाजपाने पोस्ट केला आहे.

भाजपाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस प्रवृक्ता पवन खेडा यांनी मोदी यांचा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा सांगितला आहे.

आपल्याजवळ काँग्रेस असताना पाकिस्तानसारख्या दुश्मनाची गरज काय आहे? असं भाजपानं म्हटलं आहे.

 

35Shares

Leave a Reply

%d bloggers like this: