Sun. Jun 16th, 2019

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवावी – चंद्रकांतदादा पाटील

7033Shares

आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेची निवडणूक लढवावी असं अजब वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं आहे. सांगलीमध्ये नागरिकांशी बातचीत करत असताना चंद्रकांतदादा पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव एकत्र आल्यामुळे लोकसभा निवडणूक कठीण झाल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांतदादा पाटील ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेची निवडणूक लढवावी असं अजब वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

तसेच उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव एकत्र आल्यामुळे लोकसभेची निवडणूक कठीण झाल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी सुद्धा चंद्रकांतदादा पाटील यांनी काही सल्ले दिल्यामुळे अडचणीत सापडले होते.

बुथप्रमुखांना त्यांच्या बुथवरील सर्वांची माहिती असली पाहिजे.

घराघरांत जाऊन भेटवस्तू द्या.

तसेच हळूहळू त्या घराशी मैत्रीचे संबंध वाढवा असाही सल्ला त्यांनी दिला होता.

या निमित्ताने त्या घराची अवस्था काय आहे, तेथे काय अडचणी आहेत, याची माहिती होईल असे म्हटलं होतं.

 

 

7033Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *