Wed. May 12th, 2021

अबकी बार ट्रम्प सरकार; मोदींच्या ह्यूस्टनमधील कार्यक्रमात घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सात दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असून टेक्सासमधील ह्यूस्टन शहरात हाउडी मोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री 12 वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकाच मंचावर उपस्थित होते. ह्यूस्टनच्या एनआरजी फूटबॉल मैदानात 50 हजारहून अधिक अनिवासी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची आतुरतेने वाट बघत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करत आपल्या भाषणात भारतातील लोकशाहीबाबत भाष्य केले. पंतप्रधान मोदींसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. अबकी बार ट्रम्प सरकार असेही मोदी या कार्यक्रमादरम्यान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्यूस्टनमधील 50 हजार अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. हाउडी मोदी या कार्यक्रमाचे नाव असले तरी फक्त मोदी कोणी नसून 130 कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणार व्यक्ती आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेच्या भरघोस मतांनी निवडून आलो. त्यामुळे भारतात लोकशाहीची भरपूर ताकद असल्याचे मोदी म्हणाले. जनतेच्या भरघोस मतांमुळे भारतात सर्व काही छान चालले असल्याचे पंतप्रधान मोदींनी 50 हजार अनिवासी भारतीयांना मोठ्या विश्वासाने सांगितले.

दहशतवादाविरोधात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प खंबीरपणे उभे असून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात निर्णायक लढाई लढणार असल्याने पाकिस्तानचा उल्लेख न करता मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. स्वतचा देश सांभळता येत नसून भारतद्वेषाला केंद्रस्थानी ठेवले. यावेळी मोदींनी 9/11 आणि 26/11 या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार कुठून येतात ? सगळ्यांना चांगलच माहिती असल्याचे मोदी म्हणाले.

त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी 370 कलमाबाबत माहिती देत या कलमामुळेजम्मू-काश्मीरमधील जनता विकासापासून दूर होती. जम्मू -काश्मीरमध्ये इतर राज्यांप्रमाणे अधिकार नव्हते म्हणून फुटीरतावादी अशा गोष्टी वाढत गेल्या. गरिबी, बेरोजगारी अशा समस्यांमुळे विभाजनवाद्यांचा फायदा झाला. लोकसभेत तसेच राज्यसभेत हा कलम रद्द करण्यासाठी बहुमत मिळाले असे मोदी म्हणाले. मोदींच्या या मुद्द्यावर अनिवासी भारतीयांचा टाळ्यांचा कडकडाट झाला.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट अशा दोन्ही पक्षांचे सिनेटर, प्रतिनिधी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी कार्यक्रमाला उपस्थित होण्यापूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले होते. संबोधनाचा शेवट  भारतात सर्व काही छान असल्याचे भारतातील विविध भाषेत म्हणत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *