Sun. May 16th, 2021

‘स्वच्छ कुंभ, स्वच्छ आभार’, मोदींनी धुतले सफाई कर्मचाऱ्यांचे पाय!

गोरखपूर दौऱ्यादरम्यान प्रयागराज येथे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संगमावर कुंभस्नान केलं. एवढंच नव्हे, तर त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवून त्यांचे आशीर्वादही घेतले.

मोदींनी आज कुभमेळ्यामध्ये गंगास्नान केलं. गंगेची पूजाही केली. तसंच अक्षयवडाचीही त्यांनी पूजा केली आणि हमुमंताच्या मूर्तीचं दर्सन घेतलं. मात्र त्यानंतर त्यांनी चक्क सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला

स्वच्छ कुंभ, स्वच्छ आभार!

पंतप्रधान यांनी चक्क स्वच्छता कर्मचाऱ्यांना उच्चासनावर बसवलं.

स्वतः त्यांच्या पायाशी बसून त्यांनी कर्मचाऱ्यांचे पाण्याने पाय धुतले.

1954 साली पं. जवाहरलाल नेहरूंनंतर कुंभस्नान करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले.

‘कुंभ स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं आहे,’ असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
22 हजार सफाई कर्मचारी आणि 12 हजार सुरक्षा रक्षकांचे त्यांनी मनापासून आभार मानले.

यंदा कुंभची ओळख ‘स्वच्छ कुंभ’ अशी झाली आहे.

याचं संपूर्ण श्रेय सफाई कर्मचाऱ्यांचं आहे.
जिथे 1 लाखांहून अधिक शौचालये आणि 20 हजारांहून अधिक कचऱ्याचे डबे आहेत.

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये यावर्षी गंगेच्या स्वच्छतेबाबतीत खूप चर्चा होती.

आज मी स्वत: याचा अनुभव घेतला.

‘स्वच्छ गंगा’ आणि ‘नमामि गंगा’ अभियानामध्ये प्रयागराजमधील नाविकांचाही वाटा मोलाचा आहे.

भारतीय जनतेच्या योगदानामुळे स्वच्छ भारत अभियानाची आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *