Wed. Jun 29th, 2022

‘मोदीजी, औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवा’

गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादमधील पाणी प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, औरंगाबादमधील पाणी प्रश्नाचा मुद्दा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील क्रांतीकारी गॅलरीच्या उद्घाटनावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादचा पाणीप्रश्न उपस्थित केला असून भगतसिंह कोश्यारी यांनी थेट औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींना साद घातली आहे. मोदीजी, औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवा, अशी विनंती राज्यपालांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

औरंगाबादमधील पाणीप्रश्न गंभीर असल्याचे राज्यपालांनी राजभवनातील भाषणात सांगितले आहे. शहराला सात-सात दिवसांनी पाणी येत आहे, हे योग्य नसल्याचे राज्यपाल म्हणाले. त्यामुळे पंतप्रधान मोदींनीच औरंगाबादचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी विनंती राज्यपालांनी केली आहे. मोदी है तो मुमकीन है, त्यामुळे औरंगाबादमधील पाणी योजना पंतप्रधान यांनी पूर्ण करावी, असे राज्यपाल म्हणाले.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्प अद्यापही अपूर्ण असल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

तसेच, मी पदवीदान समारंभात मराठीचा वापर वाढवला असून राजभवन हे एक लोकभवन व्हावं, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. तसेच सर्वांच्या सहकार्यातून गॅलरीचं काम वेळेत पूर्ण केले असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.