Sun. Jun 16th, 2019

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; मोहन भागवत यांनी केले मतदान

53Shares

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांनी मतदान केले आहे. नागपुरमध्ये महाल येथील भाऊजी दफ्तरी शाळेत यांनी मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मतदान केल्यानंतर मोहन भागवत यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर मतदान करणे गरजेचं असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांनी सकाळी मतदान केंद्रावर हजेरी लावली.

नागपूरच्या एका दफ्तरी शाळेत यांनी मतदान केले आहे.

तसेच मोहन भागवत यांनी मतदान करण्याचेही आवाहन केले आहे.

देशाच्या विकासासाठी आणि लोकशाहीसाठी मतदान करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा –

सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

महाराष्ट्रात 7 मतदारसंघात मतदान सुरू आहे.

विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात मतदान सुरू आहे.

 

 

 

 

53Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *