Sat. Feb 16th, 2019

राम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावाद्यांचा विरोध- सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

अयोध्येतील राम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, तर राजकारण करणाऱ्यांचा विरोध आहे. असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. ते झारखंडमधील देवघरमध्ये बोलत होते. मुस्लिम आणि ख्रिश्चन राम मंदिराच्या विरोधात नसून त्यांच्या नावावर राजकारण करणारे कट्टरतावादी आणि गुंडांचा राम मंदिराला विरोध असल्याचं भागवत यांनी म्हटलं. 

 

तसंच राम मंदिराचा वादावर कोर्टात तोडगा निघणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा परस्पर समजुतीने सोडवावा असे म्हटले होते.  

 

दरम्यान, आता सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाशी सहमती दर्शवणारं विधान केलंय. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा परस्पर सहकार्याने आणि समजूतीने सोडविण्यावर एकमत होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *