Wed. May 19th, 2021

पुण्यात अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला

पुण्यात अखेर काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा झालेली आहे. काँग्रेसचे निष्ठावान उमेदवार समजले जाणारे माजी आमदार मोहन जोशी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून काँग्रेसमध्ये कुणाला उमेदवारी दयावी यावरुन खल सुरु होते. प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी निश्चित मानली जात असताना मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने प्रवीण गायकवाड यांना धक्का मानला जातोय.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता कार्यकर्ते किती जोमाने काम करतात हे पाहणं महत्वाचे आहे. मोहन जोशी यांनी याआधी देखील 1999ला पुणे लोकसभा लढवली होती. त्यामध्ये त्यांचा भाजपचे प्रदीप रावत यांनी पराभव केला होता. त्यामुळे आता पुण्यात गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी असा सामना रंगणार आहे. मात्र काँग्रेस कितपत टक्कर देते हे देखील पाहणं महत्वाचे आहे.

मोहन जोशी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते

मोहन  जोशी हे 1972 पासून काँग्रेसचे कार्यकर्ते असून विधान परिषदेचे माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस अशा पदांवर कार्यरत आहेत.

याचबरोबर महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली आहेत.

मोहन जोशीा 1972 -73  च्या काळात राजकारणात प्रवेश केला आणि  युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.शहराध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत  उत्तमरित्या काम केले आहे.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी  युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड त्यांची निवड  केली.गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाच्या वतीने काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *