Thu. Apr 22nd, 2021

रॉयल चॅलेंजर्सने 84 धावातच कोलकाताचा उडवला धुव्वा

कोलकाता नाईट रायडर्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची सरशी…

दिवसेंदिवस आयपीएल मधली रोमांचकता वाढत चालली आहे. गुणतालिकेत देखील चढ उतार बघायला मिळत आहे. २०२० च्या आयपीएलमध्ये अनेक अनपेक्षित गोष्टी घडल्या आहेत. कालच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स ह्यांच्यात सामना झाला. कोलकाता हा कालचा सामना नक्कीच विसरणार नाही. नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी निवडली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या भेदक गोलंदाजी समोर कोलकाता संघाची थोडी ढिल्ली पडली.

कोलकाता संघाला १०० धावांचा आकडा देखील पार करता आला नाही. केवळ ८४ धावावर कोलकाता ऑलआऊट झाली. बंगळूरूच्या गोलंदाजांनी ह्या सामन्यात आपली कमाल दाखवली.मोहम्मद सिराजने एकाच सामन्यात २ मेडण ओव्हर टाकून आयपीएलमध्ये विक्रमी इतिहासात नोंदवला. त्याने केवळ ४ षटकात ८ धावा देऊन  ३ बळी घेतले. ८४ धावांचा पाठलाग बंगळूरूने  केवळ १३.३ षटकात पूर्ण केला आणि गुण तालिकेत २ स्थानावर झेप घेतली आहे. कोलकाताचा संघ सध्याला जरी चौथ्या क्रमांकांवर असला तरी कालच्या पराभवाची झळ त्यांना लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *